जिल्ह्यात आज सकाळी पहिल्या टप्प्यात 88 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9832 झाली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार 88 रुग्णांची भर पडल्याने त्यामुळे आतापर्यंत 9832 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 5636 बरे झाले. घाटी रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या 381 झाली आहे.
शहरातील 42 रुग्ण
एनआरएच हॉस्टेल 1, बेगमपुरा 1, गारखेडा 1, केळीबाजार 1, जटवाडा 1, चैतन्यनगर, हर्सुल 1, जवाहरनगर पोलिस स्टेशन जवळ 1, पदमपुरा 1, बन्सीलालनगर 2, क्रांतीनगर 9, राधास्वामी कॉलन, हर्सुल 1, एन अकरा 1, अयोध्यानगर 1, पवननगर 2, शिवाजीनगर 1, अविष्कार कॉलनी 1, प्रकाशनगर 1, ठाकरेनगर 1, जयभवानीनगर 1, एन चार सिडको 2, एन आठ सिडको 1, श्रद्धानगर 1, एन दोन राजीव गांधीनगर 1, एन तीन सिडको 1, एन सहा, सिडको 1, चिकलठाणा 1, एन सहा संभाजी कॉलनी 1, बालाजीनगर 2, नक्षत्रवाडी 1, इतर 1 या भागातील रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागात 40 रुग्ण
रांजणगाव 1, फुलंब्री 4, फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री 1, टिळकनगर, कन्नड 1, बोरगाव अर्ज, फुलंब्री 1, पळसवाडी, खुलताबाद 1, शेंद्रा कामंगर 4, कुंभेफळ 4, मोठी आळी, खुलताबाद 2, चित्तेगाव 7, भवानीनगर, पैठण 1, समतानगर, गंगापूर 1, शिक्षक कॉलनी, सिल्लोड 2, डोंगरगाव, सिल्लोड 1, पुरणवाडी, सिल्लोड 1, समतानगर, सिल्लोड 1, शिवाजीनगर, सिल्लोड 1, घाटनांद्रा सिल्लोड 1, शंकर कॉलनी, वैजापूर 1, कुलकर्णी गल्ली, वैजापूर 1, इंदिरानगर, वैजापूर 1, अण्णाभाऊसाठेनगर, वैजापूर 1, देवगाव 1 या भागातील कोरोनाबाधित आहेत.
सहा रुग्ण कुठले?
आज सकाळी पहिल्या टप्प्यात आलेल्या अहवालानुसार 88 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ 82 रुग्णांचे पत्ते जाहीर केले आहेत. इतर सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये आलेले सहा पॉझिटिव्ह रुग्ण कुठे राहतात? हे जाहीर केले नाही. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. रोज सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या जाहीर केले जाते परंतु हे रुग्ण राहतात कुठे? हे जाहीर न केल्याने नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होताना दिसत आहेत.
सिल्लोड तालुक्यात 7 रुग्ण वाढले
सिल्लोड, दि.17 (प्रतिनिधी): सिल्लोड शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून, रुग्ण वाढण्याचे प्रमाण थांबायचे नाव घेत नाही. आज सिल्लोड शहर व तालुक्यात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. सिल्लोड शहरात आज शिक्षक कॉलनीत 2, समतानगर 1, शिवाजीनगर 1 असे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ग्रामीण भागात डोंगरगाव, 1, पुरणवाडी 1, घाटनांद्रा येथे 1 रुग्ण सापडला आहे.














