सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात आनंद नगरी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि आर्थिक ज्ञान देण्यासाठी बाल आनंद मेळावा पार पडला. यामध्ये विद्यार्थीनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून वस्तू विकल्या आणि व्यवहारिक कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, 

ज्यामुळे त्यांना स्वावलंबन, आर्थिक देवाण घेवाण, व्यवहार ज्ञान तसेच संभाषण कौशल्य वाढीस लागण्यास मदत झाली आणि शाळेस जत्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले. आयोजित करण्यात आलेल्या आनंद नगरी कार्यक्रमाचे उदघाटन जि. प. पालोदचे मुख्याध्यापक दिलीप सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. तर सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे. याप्रसंगी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात स्वतः बनविलेल्या विविध पदार्थांचे ९० हून जास्त स्टॉल लावलेले. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, पालक, परिसरातील शाळा, अंगणवाडी व महाविद्यालयातील शिक्षक - विद्यार्थी यांनी बाजारात गर्दी केली होती.

सर्वांनी या बाजारातील वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, उपमा, भजे, आईस्क्रीम, केक, पराठे, लिंबू शरबत, मिठाई, इडली डोसा, समोसा, कचोरी, पापड, गुलाब जामुन असे विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी भारतीय पद्धतीने चूल मांडून बनवलेले गरमागरम भजे, पराठे, आलू वडा, अंडावडे, गुळाची चहा अशा पदार्थानी सर्वांचे पदार्थांनी लक्ष वेधून घेतले.

ग्राहक बनून आलेल्या पालकांशी संवाद साधताना आणि हिशोब ठेवताना चिमुकल्या विक्रेत्यांचा आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. पालकांनी सुद्धा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्टॉल वरील खाद्यपदार्थ विकत घेऊन नवनवीन पदार्थाचा आस्वाद घेऊन आनंद नगरीचा मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाणे आणि खाद्यपदार्थाच्या सुगंधाने शालेय परिसर
अक्षरशः बहरून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ पदार्थाचा आस्वादच घेतला नाही तर प्रत्यक्ष खरेदी विक्रीतून व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले.

विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान हवे आणि व्यवसाय सुद्धा करता यायला हवा, केवळ नफा कमवणे हा उद्देश न ठेवता सहकार्य, नियोजन, पैशाचे महत्व याचं महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे हा या मागचा उद्देश आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक प्रदीप कानडजे, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, कृष्णा पाटील, राजेश ठोंबरे, सुनील सागरे, भास्कर केरले, जयश्री चापे, महादेवी ठवरे, योगेश निंभोरे, एकनाथ जंजाळ, प्रफुल कळम, राजाभाऊ भोसले, विक्की चांदुरकर, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संतुकराव मोरे, अक्षय निकम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.