पुणे: पुणे पोलीस दलात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी (बंगल्यावर) कार घुसवायचा प्रयत्न करणार्या एका मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलीच्या कारणावरून आलेल्या रागातून या कॉन्स्टेबलने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न करणार्या पोलीस कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिश भिसे यांनी पोलिस आयुक्तांच्या आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. अमोल भिसे असं या कॉन्स्टेबलच नाव आहे. अमोल भिसे हे पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. काल पुण्यातील पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. भिसे यांना पुण्यातील एका पोलिस स्टेशनला बदली हवी होती. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र बदली न झाल्यानं चिडून त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर येतंय. अमोल भिसे त्यावेळी दारुच्या नशेत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपेक्षित असलेल्या ठिकाणी बदली मिळाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल भिसे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. अमोल भिसे हे सध्या पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. पुण्यामध्ये नुकत्याच पोलीस कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्यांच्या फेर्या पार पडल्या. या बदल्यांदरम्यान कॉन्स्टेबल अमोल भिसे यांना पुण्यातील एका विशिष्ट पोलीस स्टेशनमध्ये बदली हवी होती. यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र, काल जाहीर झालेल्या बदल्यांच्या यादीत त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी बदली मिळाली नाही. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या भिसे यांनी मद्यधुंद अवस्थेत थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाचा रस्ता धरला. त्यांनी त्यांच्याकडे असलेली कार पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजावर नेऊन जोरात ठोकली आणि जबरदस्तीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून भिसे यांना तातडीने ताब्यात घेतले. या घटनेदरम्यान कॉन्स्टेबल अमोल भिसे हे दारूच्या नशेत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या सुरक्षेचा आणि शिस्तीचा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला असून, स्वतःच्याच दलातील कर्मचार्याने अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने पुणे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.