छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी दि. ७ एप्रिल रोजी सिद्धार्थ उद्यानाला भेट देऊन येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित नागरिकांना स्वच्छ, सुसज्ज व सर्व सुविधा उपलब्ध असलेले उद्यान मिळावे, यासाठी आवश्यक सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच उद्यान परिसरात नव्याने उभारण्यात आलेले स्वच्छतागृह पुढील दोन दिवसांत नागरिकांसाठी सुरू करण्याचे निर्दे श त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.













