सिल्लोड, (प्रतिनिधी) : बाजार समितीच्या मुख्य आवारात उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थित राहून शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी व बाजार समिती प्रशासनातील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी दिवंगत माजी सभापती श्रीरंग साळवे, रामदास पालोदकर तसेच राजेंद्र राठोड व जे अहवाल वर्षात दिवंगत झाले त्यांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत बाजार समितीचा कारभार अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. बाजार समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार अधिक सुलभ, गतिमान व शेतीपूरक करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. सिल्लोड येथे उभारण्यात येत असलेल्या नॅशनल सहकारी
सूतगिरणीच्या माध्यमातून ङ्गकापूस ते कापडफ ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून, शेतकऱ्यांच्या कापसाला मूल्यवर्धनाची नवी दिशा मिळणार आहे.
सध्याची दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी, हाताला काम व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. रोजगार हमीच्या अटी शिथिल करून अधिकाधिक लोकांना काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठीही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
पंचनामे व पीक परिस्थितीचे अचूक सर्वेक्षण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या वेळी स्वतः उपस्थित राहून आपल्या पिकांची योग्य नोंद करून घ्यावी. कोऱ्या कागदावर कोणत्याही परिस्थितीत सह्या करू नयेत आणि पंचनामा वाचून व त्यातील माहितीची खात्री करूनच स्वाक्षरी करावी, असे आवाहन केले.
दुष्काळाची परिस्थिती गंभीर असली तरी राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी हाताश न होता धीर धरावा, सरकार आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त
केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती तथा संचालक केशवराव तायडे व सभापती सतीश ताठे यांनी केले. बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन करत अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमास नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जि. प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, शिवसेना सोयगाव तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, देविदास पाटील लोखंडे, उपसभापती अनुसयाबाई कौतिकराव मोरे, संचालक केशवराव तायडे, दारासिंग चव्हाण, विश्वास दाभाडे, संदीप राऊत, दामूअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, डॉ. दिनेश साळवे, अरुण शिंदे, शालिनीताई नानासाहेब रहाटे, नंदकिशोर सहारे, राजाराम पाडळे, रमेश लाठी, भाऊराव लोखंडे, शेख जावेद, शेख जाहीर यांच्यासह नरसिंग चव्हाण, संजय डमाळे, सुदर्शन अग्रवाल, अंबादास शिंदे, प्रशांत क्षीरसागर, किशोर अग्रवाल, राजु गौर, विशाल जाधव, लक्ष्मण कल्याणकर, मुरलीधर शेजुळ, परमेश्वर जिवरग, मधुकर गवळी, अशोक वाघमोडे, अशोक बनसोड, विलास शिंदे, अंकुश पाटील, कल्याणराव डवणे, मोतीराम पंडित, डॉ. फिरोज खान, बबलू पठाण, रत्नाकर बडक, अब्दुल अजीज चाऊस, प्रमोद शिंदे, मोतीराम पाडळे, एकनाथ शिंदे, नासेर पठाण, रमेश ठाकूर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी.













