छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): कंपनीच्या आर्थिक मदतीसाठी घेतलेल्या २० लाख रुपयांच्या कर्जापोटी आतापर्यंत २७ लाख ५० हजार रुपये परत करूनही आणखी ३५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात २७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अशोक सूर्यवंशी (वय ३३, रा. सक्सेस विहार, मल्हार चौक, गारखेडा परिसर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील रुंद्रा इंजिनिअरिंग कंपनीच्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी प्रवीण गरबडे यांच्या मध्यस्थीने राहुल चाबुकस्वार याच्याकडून २० लाख रुपये
घेतले होते. तक्रारीनुसार, त्यांनी वेळोवेळी एकूण २७लाख ५० हजार रुपये परत केले.
मात्र, राहुल चाबुकस्वार, प्रवीण गरबडे, आकाश साळुंके, बंटी वाघमारे आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी घराची इसारपावती जबरदस्तीने करून घेतल्याचा आरोप आहे. तसेच आणखी ३५ लाख रुपयांची मागणी करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भोले तपास करत आहेत.
दीड कोटी वसूल करूनही फ्लॅटसाठी खंडणी; अमोल साळुंकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) बांधकाम व्यावसायिकाकडून व्याजासह तब्बल दीड कोटी रुपये उकळल्यानंतरही ७५ लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅट बळकावण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. राहुल चाबुकस्वार टोळीतील आरोपी अमोल साळुंके याचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी फेटाळून लावला आहे. आरोपीचा संघटित गुन्हेगारीतील (मकोका) सक्रिय सहभाग आणि प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांना त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.
बांधकाम व्यावसायिक फिर्यादी सुनील पाटील यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राहुल चाबुकस्वार आणि आकाश
मकोकाच्या प्रथम पुरावा
▶ न्यायालयाने अभिलेखावरील गुन्ह्यांच्या नोंदींचा विचार केला. आरोपी हा कथित संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू होण्यासाठी प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच मकोका कायद्याच्या कलम २१ (३) मधील तरतुदींचा विचार करता आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार अमोल साळुंके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
साळुंके यांच्याकडून एक कोटी रुपये हातउसने घेतले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत व्याजासह दीड कोटी रुपये परत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संपूर्ण रक्कम परत केल्यानंतरही आरोपींनी साथीदारांच्या मदतीने फिर्यादीकडे प्रत्येकी ७५ लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅट देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. विविध बांधकाम साइटवर आरोपी साथीदारांसह
जाऊन कामगारांना धमकावत असल्याचाही आरोप आहे. कामगारांनी काम करू नये, यासाठी साइटवर थांबून बांधकामाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या कथित प्रकारात अमोल साळुंके याचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















