छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : एकीकडे केंद्र सरकारच्या केमिकल्स आणि फर्टिलायझर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर - जिल्ह्यांत ऑनलाइन अॅपद्वारे खत खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे, या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी मात्र शेतकऱ्यांच्या न मुळावर उठल्या आहेत. या - अॅपमधील अडचणी काही केल्या संपलेल्या नाहीत.
त्यामुळे ऐन ने खरिपात शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने १० महिने ते वर्षभरात खतांचा सर्वाधिक आणि सर्वांत कमी वापर झालेल्या ठिकाणांचा शोध घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक खतांचा वापर हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि सर्वांत कमी वापर हा कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अहवाल केंद्र सरकारला मिळाला. त्यानुषंगाने छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची महाराष्ट्रातून ऑनलाइन खत खरेदीसाठी निवड करण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
यातून 'काळ्या आईचा पोत खराब होऊ नये' हा उद्देश असल्याचीही पुष्टी सूत्रांनी जोडली. १० जून अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ४० हजार खतांची बुकिंग झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातून १३ हजार बुकिंग झाली आहे.
-- काय येताहेत अडचणी --
आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी मिळत नाही, मिळालाच तर दोनदा येतो. तोपर्यंत टाइम ऑउट होतो. शेतकऱ्याला गट नंबर, क्षेत्राची निवड केल्यानंतर मल्टीक्रॉप एंट्री करता येत नाही. संबंधित शेतकऱ्याला प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रावर स्वतः येऊन बोटांच्या ठशांद्वारे ऑथेंटिकेशन करावे लागते, यामध्ये बरेच शेतकरी महिला, वृद्ध असल्याने जाण्यास अडचणी येतात. बोटांचेही ठसे उमटत नाहीत. इंग्रजीत असल्याने अॅप ऑपरेट करता येत नाही,
कृषी सेवा केंद्र चालक पुरेसे खत बुक करत नाही. खते बुक केल्यानंतर कोड जनरेट होतो, त्यानंतर २४ तासांनंतर खत खरेदी करता येते, यात एक दिवस वाया जातो. बऱ्याच कृषी सेवा केंद्र धारकांचा युरियांचा साठा ई-पॉसवर शून्य असतानाही संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाच्या नावाने युरियाची खताची बुकिंग होते.











