मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर - खुलताबाद मतदारसंघात अभियानाची जय्यत तयारी
गंगापूर, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एक पेड माँ के नाम या पर्यावरणपूरक अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या भव्य वृक्षारोपण मोहिमेच्या नियोजनासाठी गंगापूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
गंगापूर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुण जहन्ऱ्हाड, वागवड, तहसीलदार नवनाथ गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, परिविक्षाधीन तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, गट विकास अधिकारी अक्षय भालेकर, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सकदेव, गट
शिक्षण अधिकारी अरविंद कापसे, किशोर धनायत, सभापती अर्चना सुकाशे, कविता रवींद्र चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य शेषराव जाधव, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, भाग्येश गंगवाल, नंदकुमार गांधीले, कृष्णा सुकाशे, दत्तू कराळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण, शहराध्यक्ष मारुती खैरे, भाग्येश गंगवाल, राजेंद्र राठोड, नगरसेवक राकेश कळसकर, आनंद पाटील, कृष्णकांत व्यवहारे, डॉ. आबासाहेब शिरसाट, जाफर शेठ, रज्जाक शेख, अतहर जहरी, अतुल रासकर, आयाज अहमद, गंगापूरचे तलाठी गणेश लोणे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. या अभियानाच्या माध्यमातून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघ हरित करण्याचा संकल्पही बैठकीत करण्यात आला.
बैठकीत गावनिहाय नियोजन :
वृक्षांची उपलब्धता, लागवडीसाठी योग्य जागांची निवड तसेच वृक्षांचे संगोपन यावर विशेष भर देण्यात आला. अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी युवक, महिला, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि विविध घटकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक पेड माँ के नाम हा संदेश केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून तो पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात विक्रमी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाने आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. जनसहभागातून हा मतदारसंघ हरित आणि पर्यावरणपूरक करण्याचा आमचा संकल्प आहे.
-प्रशांत बंब, आमदार गंगापूर,













