सिल्लोड (प्रतिनिधी) : शहरातील एकही कुटुंब बेघर राहू नये, यासाठी नगरपरिषदेमार्फत ५ हजार घरकुलांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात यावा. या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू. तसेच नोटरीधारक लाभार्थ्यांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोड नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकाम मंजुरी आदेश वितरण समारंभनगरपरिषद कार्यालय परिसरात उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या ८० तर रमाई आवास योजनेच्या ८५ असे एकूण १६५ लाभार्थ्यांना बांधकाम मंजुरी आदेश तसेच रमाई घरकुल योजनेच्या टप्पा ३ मधील दोन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, विनोद माजी उपनगराध्यक्ष मंडलेचा, नगरसेवक राजश्री निकम, नंदकिशोर सहारे, आसिफ बागवान, अकील ७ शाळेतील विद्यार्थ्यांना विविध सुविधा शहरात नगर परिषदेच्या एकूण ७ शाळा सुरू असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत गणवेश, शालेय साहित्य अशा विविध सुविधा उपलब्ध करून दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवकांनी सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभमिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. घरकुल योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेत भ्रष्टाचार अथवा दलाली खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भ्रष्टाचार, दलाली खपवून घेणार नाही :
वसईकर, सुनील दुधे, रईस खान पठाण, अशोक बन्सोड, नरेंद्र बापू पाटील, शेख बाबू शेख भिकन, डॉ. फिरोज खान, विशाल जाधव, चांद मिर्झा, शेख मोहम्मद कय्युम, सिद्धेश्वर आहेर, बबलू पठाण, सत्तार हुसेन, मनोज झंवर, किशोर अग्रवाल, नूर मोहम्मद कुरेशी, जितेंद्र आरके., शेख इमरान (गुड्डू), शेख बाबर, जुम्मा खा पठाण, सय्यद पाशु, शेख सलीम हुसेन तसेच नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेख जावेद, प्रभाकर पारधे, हाजी मोहंमद हनिफ, मुस्ताक देशमुख, मोईन पठाण यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













