नवी दिल्ली : आमच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे पण पोलीस परवानगी देत नाहीत. आमच्या आंदोलनाला लोकांना आतमध्ये येऊ दिल जात नाहीये. आम्ही काय आतंकवादी आहोत का? अशी वागणूक का आम्हाला देत आहात? असा सवाल सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच दिल्लीतील जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावरून अभिजित दीपके यांनी सरकारवर टीका केली आहे. जे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, त्यांना चांगली वागणूक आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर आम्हाला अशी वागणूक, हे काही योग्य नाही. आज नीट परीक्षा होत आहे, त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. तुम्ही चांगला पेपर द्या, इकडच आंदोलन आम्ही सांभाळतो. परीक्षा झाल्यावर तुम्ही जंतर मंतर इथ या असे आवाहन अभिजित दीपके यांनी केलं आहे.
राजीनामा होत नाही तोपर्यंत आमच आंदोलन असच सुरू राहील
जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमच आंदोलन असच सुरू राहील. असा पवित्राही अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी घेतला आहे. जे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत त्यांना चांगली वागणूक आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर आम्हाला अशी वागणूक हे काही योग्य नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजेल. अन्यथा आमच आंदोलन असच सुरू राहील, असेही ते म्हणाले.
मुंबईतील परळ भागात असेल महर्षी दयानंद कॉलेज हे NEET पेपर चे केंद्र आहे. या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांना दोन मिनिटे उशिरा पोहचल्याने परीक्षेला बसता आले नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला. इत्तर विद्यार्थांच्या पालकांनी ही या विद्यार्थ्यांना आता घ्यावे म्हणून प्रशासनाकडे विनंती केली. तर NTA अधिकाऱ्यांनी नियमाच्या पुढे जात येत नाही असे म्हणत दोन्ही विद्यार्थ्यांना प्रवेशास मनाई केली.