सिल्लोड (प्रतिनिधी): रहीमाबाद येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सिल्लोड शहरात आगमन होताच आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जय भवानी, जय शिवरायचा जयघोष करत उत्साहात स्वागत करण्यात आले.
रहीमाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा परिसरातील शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, न. प. तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, दत्ता शेजुळ, कृउबा समितीचे संचालक जयराम चिंचपुरे, संजय पा. डमाळे, रहिमाबादचे सरपंच सुभाष नवल, हरिभाऊ चिंचपुरे, अनिल कुळकर्णी, भिकन राऊत, बबन बोडखे, बाबुराव बोडखे, माजी सरपंच विलास शिंदे, अंकुश पाटील आदिंसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.












