पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला गेलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे रविवारी रात्री पैठण शहरात आगमन झाले यावेळी भाविकांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.

पंढरपूर येथील आषाढी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले योगेश महाराज गोसावी यांच्या अधिपत्याखाली श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी सात जुलै रोजी पैठण येथून पंढरपूरला रवाना झाली होती. आषाढी एकादशी सोहळा संपल्यानंतर भानुदास जयंती साजरी करून ही नाथांची पालखी पुन्हा पैठणकडे मार्गस्थ होते. 

हि पालखी रविवारी एकादशीच्या दिवशी पैठण शहरात दाखल झाली. पालखी छत्रपती शिवाजी वनी क्लिनिक
महाराज चौकात आल्यानंतर या ठिकाणी नगराध्यक्ष विद्या भूषण गोसावी, उपनगराध्यक्ष तुषार पाटील तसेच विविध पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह वारकरी भाविकांनी तसेच पैठणकरांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखी समाधी मंदिरात गेल्यानंतर या ठिकाणी आरती होऊन आषाढी सोहळ्याची सांगता झाली.