युवक महोत्सव : ललित कलेत विद्यार्थ्यांनी भरले रंग
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) केंद्रीय युवक महोत्सवात गेल्या दोन दिवसात उद्घाटन समारंभासह विविध रंगमंचावर सादर झालेल्या कलांमधून दुष्काळाच्या गांभीर्यावर वारंवार मंथन झाले. दुष्काळ लढायाला जसे शिकवितो तसेच आलेल्या संकटावर मत करण्यासाठी उपाययोजना करण्याची निकडही पटवून देतो. या विषयी विविध रंगमंचावर सादरीकरण करून युवक कलावंतांनी आशेचा किरण दाखवला..
केंद्रीय युवा महोत्सव अंतर्गत स्टेज क्रमांक ४ ललितरंग (ललित कला विभाग) या मंचावर दुसऱ्या दिवशी मंचावर इन्स्टॉलेशन,
स्वरंगमध्ये उमटले विविध रागांचे सूर
दुसऱ्या दिवशी स्वररंग विविध रागांचे सूर उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीत स्पर्धा उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पहल्या. या मुख्य मंचावर भारतीय शास्त्रीय सुरवाद्य, भारतीय शास्त्रीय गायन आणि भारतीय शास्त्रीय तालवाद्य अशा तीन प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन आणि वादनातून भारतीय संगीतातील विविध अजरामर रागांची अप्रतिम मांडणी केली. सकाळच्या सत्रात राग भैरवच्या भक्तीमय आणि गंभीर सुरांनी वातावरणात एक वेगळीच अनुभूती आणली.
चित्रकला, रांगोळी आणि व्यंगचित्र हे विषय सादर झाले. या स्पर्धे करिता परीक्षक म्हणून चित्रकार नंदकुमार जोगदंड, किशोर जाधव, दिग्विजय कुंभार यांची उपस्थिती होती. ललितरंग या
स्टेजच्या आयोजन समितीमध्ये विभाग प्रमुख डॉ. शिरीष अंबेकर अध्यक्ष तर समिती सदस्य डॉ. निखिल राजवर्धन प्रा. बाळकृष्ण छडीदार, प्रा. स्नेहा गेडाम, प्रा. धनश्री भागडकर तसेच संजय
माजीनगर
र मराठवाडा विद्यापीठ,
दसव २०२६
नाट्यरंग
राऊत आणि गणेश ढवळे यांनी काम पाहिले. ललितरंग
स्टेजच्या आयोजन समितीमध्ये विभाग प्रमुख डॉ. शिरीष अंबेकर
कलारंग सादर
केंद्रीय युवा महोत्सव स्टेज क्रमांक २ कलारंग, कलाप्रकार सादर केले. लोकवाद्यबंद रामदास कला वाणिज्य महाविद्यालय घनसावंगी यांनी पारंपरिक वाद्य वापरले. यामध्ये खंजिरी, हंडा, परात, ढोलकी, टिंबडी, चिपळ्या, खंजिरी, छम छम पंचमीच्या काळामध्ये वारी या नावाच्या महोत्सवामध्ये हे वाद्य वाजवले जातात ते वाद्यवृंद या संघाने वाजवले. विवेकानंद कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने लोकवाद लोकवाद्यपर्यंत या कला प्रकारामध्ये संबळ हलगी डफ मंजिरी टाळ पखवाज ढोलकी घुंगरू सनई बासरी सुंदरी ताशा या वाद्यांचा उपयोग केला आणि अतिशय सुंदर संगीताचा मिलाप त्यांनी करून आणला. देवगिरी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांनी आपल्या लोक वाद्यपर्यंत या कलाप्रकारांमध्ये ढोलकी संबळ मृदंग ढोल ताशा दिमडी सोंडकर बासरी तुन तुना डफ चिपळ्या ताशा आणि घुंगरू या वाद्यांचा वापर केला. या मंचहवरील स्पर्धेसाठी डॉ स्मिता साबळे, डॉ. दराडे यांनी समन्वक म्हणून काम पहिले. तसेच डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. संजय बिरंगणे, डॉ. विनोद जाधव, डॉ. तांदळे, डॉ. दांडगे यांनी काम पहिले.
एआयच अल्गोरिदमवर तरुणाईचे भाष्य
महोत्सवात आयोजित वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत मराठवाडयातील दुष्काळ ते 'एआय'च्या अल्गोरिदम या विषयावर युवकांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाअंतर्गत वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा चुरशीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये मराठवाड्याच्या विविध महाविद्यालयांतून आलेल्या युवा वक्त्यांनी चालू घडामोडी, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि भाषिक अस्मितेवर आपले अभ्यासपूर्ण व प्रभावी मत मांडून सभागृहाची मने जिंकली.
अध्यक्ष तर समिती सदस्य डॉ. निखिल राजवर्धन, प्रा. बाळकृष्ण
छडीदार, प्रा. स्नेहा गेडाम, प्रा. धनश्री भागडकर तसेच संजय
राऊत, गणेश ढवळे यांनी काम पाहिले.















