टाके देण्यासाठी धागा उपलब्ध नसल्याने उपचारासाठी महिला तासभर ताटकळली

Foto

पैठण- येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात टाके देण्यासाठी इथेलॉन हा धागा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला तासभर उपचारासाठी ताटकाळत राहण्याचा प्रकार आज सकाळी घड़ला. बाहेरून धागा विकत आणुन दिल्या नंतर जखमी महिलेवर प्रशिक्षणार्थीं ड़ॉक्टरांनी उपचार केले. 

 

आज एकादशी असल्याने नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी अंबड़ येथील तिन महिला पैठण येथे आल्या होत्या.गोदावरी नदीमध्ये स्नान करून नाथांचे दर्शन घेऊ असे ठरवले. या तिन्ही महिलांनी गोदास्नान करून किनार्‍यावर येत असतांना बबाबाई तुकाराम खराटे (५०) या महिलेचा पाय घसरला. त्यामुळे महिला खाली पड़ल्यामुळे त्यांच्या ड़ोक्याला गंभीर ईजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्यामुळे तिला सोबत असलेल्या नातेवाईकांनी उपचारासाठी शासकीय दवाखान्यात नेले.

 

त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थीं डॉक्टरानी टाके देण्यासाठी लागणारे इथेलॉन नावाचा धागा उपलब्ध नसल्यामुळे ते बाहेरून आणा असे सांगितले. सदर महिलेची नातेवाईक महिला चिठ्ठी घेऊन पैठण शहरात फिरत होती. सकाळी मेड़िकल दुकानात उघडे नसल्यामुळे महिला बसस्थानक परिसरातील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आली. या ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांना सदर महिलेने आपबिती सांगितली असता, पवार यांनी तात्काळ महिलेला डॉक्टरांनी लिहून दिलेले साहित्य खरेदी करून दिले. एक तासभर महिला उपचारासाठी विव्हळत दवाखान्यात पड़ून होती.

 

पवार यांनी इथेलॉन धागा प्रशिक्षणार्थीं डॉक्टरच्या हातात दिले. या प्रशिक्षणार्थीं डॉक्टरने सदर महिलेवर उपचार केले. या ठिकाणी ड्यूटीवर असलेले ड़ॉ.संदीप हे इतरत्र फिरत असल्याचे दिसले. येथील शासकीय दवाखान्यात नेहमी औषधांचा तुटवडा असतो. औषध बाहेरून आणा, असे रूग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते.रूग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टर, कर्मचार्‍यांकडून नेहमी अरेरावीची भाषा वापरली जाते.

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker