नाशिक : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. विशेष तपास पथकाच्या चौकशीत शनिवारी एक नाट्यमय घडामोड घडली. खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधवला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली असता, दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, माहिती देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. या ङ्गहायव्होल्टेजफ वादामुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीरज जाधव हा या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जात असून, त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
अशोक खरातकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीरज जाधव याने खरातच्या कार्यालयातून महिलांवरील अत्याचारांचे व्हिडिओ मिळवले होते. सुरुवातीला त्याने हे व्हिडिओ वापरून खरातलाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या बदल्यात तब्बल पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, पैसे न मिळाल्यानंतर त्याने पीडित महिलांकडे वळत त्यांनाही धमकावण्यास सुरुवात केली. शिर्डीतील एका विवाहित महिलेला मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावण्यात आले. तसेच, तिला प्रत्यक्ष भेटून व्हिडिओ दाखवत दबाव टाकल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.
महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ
दरम्यान, नीरज जाधवने सिडको परिसरातील एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवला. हाच व्हिडिओ या प्रकरणातील टर्निंग पॉइंट ठरला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत खरात आणि जाधव या दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.
नीरज जाधवच्या सीडीआरमध्ये सापडले 40 महिलांचे नंबर
तसेच, कडून नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड () तपासण्यात आला असून, सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती समोर येत आहे. जाधवच महिलांना कॅप्टन खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या तो संपर्कात असल्याने त्याचे कारनामे आता उघड होणार आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड नीरज जाधवच्या मधून आता महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.