अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी

Foto
नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने ताबा घेतल्यानंतर, खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत म्हणजेच ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीच्या कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. ङ्गङ्घआरोपीची गुन्हे करण्याची पद्धत ( ) एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केले आहेत. या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने कोठडी मंजूर केली. अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
खरात प्रकरणी तपासातील महत्त्वाच्या आणि धक्कादायक बाबी.
- भक्तांना घाबरवण्यासाठी वीस फुटाचा नाग रिमोट कंट्रोल ने फिरवत असल्याचा समोर. 
 - अशोक खरात भक्तांना फसवण्यासाठी दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसह इतर वस्तूंचा वापर करून चमत्काराचा बनाव करत असल्याचा उघड. 
- अशोक खरातचे अनेक बडे नेते आणि अधिकार्‍यांचे जवळचे संबंध असल्याचा उघड आणि त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल. 
- अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू. 
- अशोक खरातच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून पाचशे कोटीपेक्षा जास्त आकडा वाढण्याची शक्यता.