राजस्थान: मुख्यमंत्रीपदाची माळ गहलोत यांच्या गळ्यात तर पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरच मानावे लागणार समाधान

Foto

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये सत्ता मिळविल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार ही उत्सूकता लागून होती. अखेर शुक्रवारी दिल्ली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत तर उपमुख्यमंत्री पदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोणाची निवड करावी हे आव्हान राहुल गांधींसमोर होते. गहलोत आणि पायलट या दोन्ही नेंत्यांचे समर्थक मुख्यमंत्री पदाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. सचिन पायलट हे युवकांचे नेतृत्व असून ते मुख्यमंत्री व्हावे ही तरुणांची ईच्छा होती. मात्र त्यांना आता उपमुख्यंत्रीपदावरच समाधान मानावे लागणार आहे. मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर गहलोत यांनी राजस्थान मधील जनतेचे आभार मानत निवडणूकांच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार असल्याचे गहलोत यांना सांगितले.