अशोकराव चव्हाणांनी भावी खासदारांसोबत इच्छुक आमदारांना लावले कामाला

Foto
लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणूक कामाला लागले आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे आणि मताची टक्केवारी वाढावी यासाठी लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जाहीर सभेत सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काँग्रेसची बाजू भक्‍कम होणार आहे. 

लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळी कामाला लागली आहे. भाजप नेत्यांच्या वतीने राज्यभर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने भाजपच्या वतीने जाहीर सभा घेऊन पक्ष प्रचार करण्यात येत आहे. 
तर काँग्रेसच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकरी, कामगार, युवक, महिला यांच्यासाठी कोणतीच कामे केली नाहीत. त्यामुळे सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे वरील सर्व प्रश्‍न घेऊन मोर्चे, आंदोलने व जाहीरसभा घेऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला आहे. गुरुवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा सिडको परिसरात झाली. यावेळी खा. चव्हाण यांनी लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या महिन्याला राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर सरकार राजीनामा देईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे चव्हाण यांनी भाकीत व्यक्‍त केले.

चव्हाण यांचा या वक्‍तव्याने राज्यभरात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताचे खंडन केले. तर शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नसल्याचे सांगितले. पण जर निवडणुका झाल्याच तर त्यासाठी आम्ही तयार असल्याचे देसाई यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली आहे. 
लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका पिल्‍लु सोडून काँग्रेस पक्षाने आपली मते भक्‍कम करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात गतवेळेपेक्षा यावेळी इच्छुकांची संख्या वाढली आहे. तसेच विधानसभा निवडणुकाच्या तयारीला ही अनेक भावी आमदार कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत जास्त काम करणार्‍यांचाच विधासभेसाठी विचार केला जाणार आहे. तसेच ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्यच मिळेल, तेथील कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाणार आहे. 

त्यामुळे काँग्रेसची मंडळी जोरात कामाला लागली आहे. चव्हाण यांच्या वक्‍तव्याला आधार आहे. कारण यापूर्वी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी व राज्यात युतीची सत्ता असताना १९९९ साली विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. पण यावेळी केंद्र आणि राज्यातील भाजप युतीचे सरकार पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी युतीचे नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker