विधानसभा अध्यक्षांनी बैठकीत समस्या मांडणे हे दुर्देवी ; बागडेंच्या कार्यपद्धतीवर आमदार शिरसाठांचे ताशेरे ; नियोजन बैठकीतच रंगली राजकीय जुगलबंदी

Foto

शिवससेनेचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिल्यांदाच  जिल्हा नियोजन समितीची बैठक  जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत राज्याच्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विविध कामा संबंधी समस्यांचा पाढा वाचल्याने ही बाब हेरत हा प्रकार दुर्देवी असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याच कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. 

बैठकीच्या प्रारंभी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाकरवाडी येथील शेतकऱ्यांचे अर्धे पैसे मिळाल्याचे सांगत आरोग्य केंद्र दुरुस्तीकरिता पैसे नाहीत, यासह विविध समस्या मांडल्या. तसेच गौण खनिज उत्खनन ज्या गावांच्या परिसरात होते तेथील ग्रामपंचायतींना त्यातून मिळणाऱ्या पैशांच्या लाभ मिळावा असा आग्रह बैठकीत धरला.  विधानसभा अध्यक्षांनी हा मुद्दा मांडताच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी हा मुद्दा पुढे करत जे विधानसभा अध्यक्ष कुठल्याही मंत्र्याला काम सांगू शकतात त्यांनी  सभागृहात असेच समस्यांचे विषय मांडणे हे दुर्दैवी बाब असल्याचे स्पष्ट केले.  विधानसभा अध्यक्षांनी शिरसाठ यांना उद्देशून तुम्हाला जे सांगायचे ते सरळ सांगा माझ्या आड नको असे सांगितले. यानंतर पुन्हा आपला समस्या मांडत आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील आम्ही ज्या विधानसभा अध्यक्षांकडे प्रश्न मांडतो तेच विधानसभा अध्यक्ष या बैठकीत प्रश्न मांडतात असे म्हणताच यावर मी  आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रश्न मी मांडतो असे बागडे म्हणाले. 

नियोजन बैठकीतच रंगली राजकीय जुगलबंदी 

शिवससेनेचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच शहरात आले असता त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीदरम्यान भाजपाविरुद्ध शिवसेना काँग्रेस सह इतर पक्षाचे पदाधिकारीही एकवटल्याचे बैठकीदरम्यान दिसून आले. बैठकीत एकमेकांवर कुरघोड्या करत भाजपाविरुद्ध शरसंधान साधले. विद्यमान विधानसभा अध्यक्षांना एकाकी पाडत शिवसेना काँग्रेसच्या आमदारांनी बागडे यांच्यावरच ताशेरे ओढले. ज्यांनी प्रश्न सोडवायला पाहिजे तेच समस्या मांडत आसल्याची सरबत्ती जोडत बागडेंना टार्गेट करण्यात आले. त्यामुळे बागडेंनीही आपल्या स्टाईल मध्ये आमदारांचा समाचार घेत चांगलेच फैलावर घेतले. बागडे आणि सत्तार, शिरसाठांमध्ये नियोजन बैठकीतच चांगलीच राजकीय जुगलबंदी यावेळी रंगलेली दिसून आली. 

यांची होती उपस्तिती 

जिल्हा नियोजन बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले जिल्ह्यातील विविध मतदार संघाचे आमदार व सदस्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्याचा पालकमंत्री आमचाच - सत्तार

आज शनिवारी पार पडलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक ही पालकमंत्र्यांची शेवटची बैठक असणार आहे. यानंतर निवडणूक आचारसंहिता आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका  व विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हा आम्ही व्यासपीठावर असू जिल्ह्याचा पालकमंत्री आमचाच असेल असे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बैठक संपल्यानंतर दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker