गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात गाय वाहतूक करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी वाहनाचा पाठलाग करून धमकावल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली असून गाडीचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परदेशीपुरा (ता. गंगापूर) येथील अबू बकर अनिस कुरेशी (वय २५) हे दुधाळ जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी या घटनेमुळे गंगापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा अशा प्रकारे वाहनाचा पाठलाग करून धमकावणे ही गंभीर बाब आहे. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एक गाय खरेदी करून ती विक्रीसाठी आणली होती. दरम्यान, अकोली वडगाव येथील ग्राहकांनी ती गाय पसंत करून ३१,५०० रुपयांत सौदा निश्चित केला. मात्र, गाय जनन्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगत ग्राहकांनी ती परत नेण्यास सांगितले. त्यानुसार कुरेशी हे
गाय पुन्हा घेऊन गंगापूरकडे निघाले होते. दरम्यान, लासूर नाका परिसरात तीन मोटरसायकलवरून आलेल्या पाच जणांनी त्यांच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला. हातात लाकडी दांडे घेऊन शिवीगाळ करत त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिला.
घाबरलेल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात चालक व सहप्रवासी यांना किरकोळ दुखापत झाली असून गाडीत असलेल्या गाईलाही मार लागला आहे. या घटनेनंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी तेजस सोनवणे, संभाजी शिवराज दांरुटे यांच्यासह अन्य तीन व्यक्ती विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी फरार आहे. गंगापूर पोलीस पुढील तपास सुरू आहे.












