छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): खंडणी आणि जिवे मारण्याच्या धमकीची तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याने थेट पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोरच अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी घडली. हेमंत अंबादास जाधव (जिल्हा सचिव, मनसे) असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पुंडलिकनगर पोलिसांच्या या बोटचेप्या भूमिकेमुळे संताप व्यक्त होत आहे.
हेमंत जाधव यांनी ३० मार्च २०२६ रोजी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. जाधव आणि त्यांच्या परिसरातील नागरिकांनी गल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या कथित अतिक्रमणाविरोधात महापालिकेकडे
वारंवार तक्रारी केल्या होत्या. याच रागातून संबंधित व्यक्तीने जाधव यांना त्रास देण्यास सुरुवात केली.
गेल्या काही दिवसांपासून जाधव यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून अतिक्रमण प्रकरणात पडू नकोस, अन्यथा परिणाम
वाईट होतील. तुझ्या नावाची दोन लाखांची सुपारी दिली आहे, अशी थेट धमकी दिली जात होती.
या प्रकरणी जाधव यांनी पुंडलिकनगर पोलिसांचे दरवाजे ठोठावले, मात्र दाद मिळाली नाही.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















