औरंगाबाद - दिल्लीमधील वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांवर चेहऱ्याला मास्क लावून फिरण्याची वेळ आली आहे. तशीच वेळ औरंगाबादकरांवर लवकरच येईल अशी शक्यता आहे. औरंगाबाद शहरातील हवेतील प्रदुषणाने ८५ टक्क्यांपर्यंतची पातळी गाठली आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये हवेतील प्रदुषणात थोडी वाढ होत असते. मात्र यंदा फटाक्याच्या धुरामुळे किंवा ध्वनी प्रदुषणात वाढ नोंदली गेली नाही, तर हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे. याला कारणीभूत शहरातील कचरा असल्याचे तज्ञांचे मत आहेे. दिवाळीच्या दिवसात शहरातील प्रदूषणाची पातळी चांगलीच वाढली असून कचऱ्याचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर फटाक्यांचा आवाज आणि धूर काहीसा कमी झाला असला तरी हवा आणि पाण्याचे प्रदूषण मात्र औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याचे समोर आले आहे.
यावर्षी सुप्रीम कोर्टाच्या नियमांचे पालन न
करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात
आले होते. त्याच बरोबर रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी होती.
या नियमाचे उल्लंघन झाले असले तरी आवाजाची पातळी आणि प्रदूषण आवाक्यात ठेवण्यात यश
आले असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यावर्षी ध्वनी प्रदूषण नियंत्रणात
राहिले आहे. शहरातील हवेचे प्रदूषण मात्र 85 टक्क्यांवर वर
पोहोचले आहे. तर पाण्याचे प्रदूषण 50 टक्क्यांवर गेले आहे. हवेतील प्रदूषणाची
पातळी साधारणतः 60 ते 65 टक्के होती. दिवाळीच्या काळात ही पातळी
85 टक्क्यांवर
पोहोचली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा 125 ते 145 डेसिबल एवढी ठेवण्यात आल्याने आवाजाचे
प्रदूषण 60 टक्क्यांवर
पोहोचले होते.
कचरा बनतोय
जीवघेणा
शहराची प्रदूषण पातळी वाढविण्यात कचऱ्याचा
मोठा हातभार लागला आहे. गेले वर्षभर कचरा कोंडीने शहरवासीय त्रस्त आहेत. दिवाळीच्या
दिवसात कचऱ्याचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले. ही पातळी धोक्याच्या बाहेर नसली
तरी येत्या काही दिवसात या प्रदूषणात आणखी वाढ होणार असल्याचा धोका तज्ञांनी
व्यक्त केला आहे. कचऱ्याचे प्रदूषण 80 टक्क्यांवर
पोहोचले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ही पातळी खूपच अधिक आहे. हवेतील तसेच पाण्यातील
प्रदूषणापेक्षा कचऱ्यापासून झालेले प्रदूषण सर्वाधिक त्रासदायक ठरणारे आहे. विशेषतः
शहरातील मध्यवस्तीत कचऱ्याचे मोठे प्रदूषण पसरत आहे. यावर तातडीने उपाय शोधला गेला
पाहिजे असा इशारा प्रदूषण मंडळाने दिला आहे.












