छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): शहराचे मध्यवर्ती ठिकाण आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या औरंगपुरा परिसराचे नाव आता अधिकृतपणे संभाजीपेठ झाले आहे. महापालिकेच्या सोमवारी (दि. २०) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील चर्चेनंतर बहुमताने हा महत्त्वाचा निर्णय मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी संभाजीपेठ असे अधिकृत नाव देण्याच्या प्रस्तावावरून सभेत जोरदार वादंग झाले. या प्रस्तावाला उबाठाचे नगरसेवक राशिद मामू यांनी तीव्र विरोध दर्शविला. अखेर चर्चेअंती प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा परिसराचे नामकरण संभाजीपेठ असे करावे, असा प्रस्ताव स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी सोमवारी सभागृहात मांडला. अनेक वर्षांपासून या भागाला संभाजीपेठ म्हणून संबोधत असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली. मात्र या प्रस्तावावर शिवसेना (उबाठा) चे नगरसेवक रशिद मामू यांनी आक्षेप घेतला.
तसेच मोठ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नाव लहान भागाला देणे योग्य नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. या विरोधावरून सभागृहात वातावरण
रस्ता, उद्यानांचेही नामकरण
▶ महापौर राजूरकर यांनी प्रस्ताव पारित करत संभाजीपेठ नामकरणास मंजुरी दिल्याची घोषणा केली. तसेच एन-६ मधील उद्यानाला ओंकार उद्यान, सातारा भागातील चौकाला प्रल्हाद महाराज चौक, मुकुंदवाडीतील कोडा संकुलाला जय भवानी कीडा संकुल, पैठण रोडवरील मार्गाला संतश्रेष्ठ एकनाथ महाराज मार्ग, द्वारकानगरीतील सभागृहाला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सभागृह व भगतसिंगनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकाला तुळजाभवानी चौक, सिटी चौक ते गुलमंडी मार्गावरील चौकांना श्री कृष्ण सुदामा चौक असे नामकरण करण्यात आले.
तापले. नगरसेवक राजू वैद्य यांनी टोला लगावत, पक्षाची भूमिका अजूनही काहींना समजलेली नाही, अशी टीका केली. वाद अधिक वाढत असल्याचे पाहून शिवसेना (उबाठा) चेच नगरसेवक सचिन खैरे यांनी वेगळी भूमिका घेत प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions










