छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): सिडको परिसरात शनिवारी (दि. ११) हिरव्या रंगाचा पाणीपुरवठा झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा तातडीने अलर्ट झाली आहे. तक्रारीची दखल घेत प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी रविवारी (दि. १२) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. यासोबतच शहरातील विविध भागांतील पाच प्रमुख जलकुंभांमधील पाण्याच्या गुणवत्तेची पाहणी व तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण आणि एकंदरीत पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे समाधानकारक व सुरक्षित आढळून आल्याची माहिती मुख्य अभियंता पलांडे यांनी दिली आहे.
रविवारी सकाळी नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली असता, रेसीडयूअल क्लोरीन प्रमाण ३.०० पीपीएम आढळून आले. त्यानंतर दुपारी सिडको परिसरातील एन ५, एन- ७ तसेच वेदांतनगर, क्रांतीचौक, विश्वभारती कॉलनी या पाच जलकुंभातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. या जलकुंभांवरील पाण्यातील क्लोरिनचे
मुख्य अभियंत्यांकडून जलकुंभांची तपासणी |
प्रमाण समाधानकारक असल्याचे आढळले. उंच जलकुंभांवर आढळलेले रेसीड्यूअल क्लोरीनचे प्रमाण हे जलकुंभापासून ग्राहकाच्या घरापर्यंतच्या वितरण वाहिनीत संभाव्य सूक्ष्म जीवजन्य दूषितीकरणापासून पाण्याचे संरक्षण करण्यास पुरेसे असल्याचे मुख्य अभियंता पलांडे यांनी सांगितले.
रेसीड्यूअल क्लोरीन म्हणजे काय ?
पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा मिसळल्यानतर त्यातील काही क्लोरीन सूक्ष्मजीव, संद्रिय पदार्थ व इतर अशुद्ध
पाण्याची गुणवत्ता समाधानकारकतेचा दावा
घटकाशी अभिक्रिया करून खर्च होते. या अभिक्रियेनंतर पाण्यात जी क्लोरीनची मात्रा शिल्लक राहते, तिला 'रेसीड्युअल क्लोरीन असे म्हणतात.
ही शिल्लक क्लोरीन वितरण व्यवस्थेमध्ये पाण्याचे सतत निर्जंतुकीकरण करत राहते आणि पुन्हा होणाऱ्या दुषितीकरणापासून पाण्याचे संरक्षण करते. जलवाहिन्या व जलकुभांमध्ये सूक्ष्मजीवाची वाढ रोखते. वितरण व्यवस्थेत गळती अथवा बाह्य दूषितीकरण झाल्यास पाण्याचे संरक्षण करते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














