पैठण, (प्रतिनिधी) _: सर्वात जास्त चितेगाव तर सर्वात कमी पिंपळवाडी गटात मतदान झाले आहे. चितेगाव ८०.८९ टक्के बिडकीन ८०.५५ टक्के आडुळ, ७७.३९टक्के पाचोड, ७६.२३टक्के दावरवाडी ७१. ४८, टक्के ढोरकिन७८.६८, टक्के पिंपळवाडी. ३० टक्के विहामांडवा७१.१९, टक्के नवगाव ७३.२३ टक्के एकूण सरासरी ७४.५८टक्के या प्रमाणे मतदानाची टक्केवारी राहिली.
एकूण २ लाख ४७ हजार, ८४१ पैकी १ लाख, ८४हजार, ८५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष १लाख २९ हजार २६८ पैकी ९८ हजार ३०१ महीला १ लाख १८ हजार ५७३ पैकी ८६ हजार ५४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रावर सुविधाचा अभाव पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ३०६ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले परंतु यापैकी बऱ्याच मतदान केंद्रावर गैरसोय आढळून आली आहे. अनेक मतदान केंद्राच्या साफसफाई सुद्धा करण्यात आल्या नव्हत्या कर्मचाऱ्यांना तसेच मतदारांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यामुळे कर्मचारी व मतदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी व पोलीस बंदोबस्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली आहे.











