कृषी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांना पुरस्कार

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : येथील कृषी महाविद्यालयाच्या तीन प्राध्यापकांना उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार चंदिगड येथे झालेल्या जागतिक कृषी परिषदेमध्ये देण्यात आला. या आंतरराष्ट्रीय परिषदेत कृषी क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते. या संशोधन परिषदेमध्ये डॉ. समाधान लक्ष्मण चोपडे यांना उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी पीएचडी मध्ये हवामान बदलाचे जनावरांवर होणारे परिणाम यावर संशोधन केले आहे. प्रा. कैलास अंबादास भालेराव यांना उदयोन्मुख उद्यानशास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांनी संत्र्याच्या नुसलर जातीची वाढ, फळ गळती, उत्पन्न, गुणवत्ते वर सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या मातीतील आणि पानावरील फवारणीच्या परिणामाचा अभ्यास यावर संशोधन केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित केले.

प्रा. अश्विनी दौलत भोसले यांना उद्यानविद्या क्षेत्रातील उत्कृष्टतेच्या पुरस्काराने सन्मानित केले. संत्र्याच्या नुसलर जातीची वाढ, फळगळ, उत्पन्न, गुणवत्ता यावर होणारे परिणाम यावरती संशोधन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदयसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्रुबा घाडगे, कॅम्पस प्रभारी अमर शेजुळ, प्रशासकीय अधिकारी तुषार नगरे व प्राचार्य डॉ. एम. के. घोडके, उपप्राचार्य डॉ. जी. के. बहुरे यांनी अभिनंदन केले.