भव्य शोभा यात्रेत समाजबांधवांची मोठी उपस्थिती
पैठण, (प्रतिनिधी) सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोलाल झूलेलाल च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतीषबाजीत पैठण शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शुक्रवारी उदासी महाराज मठात भगवान झूलेलाल यांच्या प्रतिमेची पूजा आमदार विलास भूमरे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी भगवान झूलेलाल यांचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यासाठी तसेच मठ परिसर विकासासाठी अधिक निधि देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सायंकाळी भगवान झूलेलाल आणि पूज्य बैराणा साहेब यांच्या पूजनानंतर शोभायात्रेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शिवराज भूमरे, दूध संघाचे नंदलाल काळे, भूषण
कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पंचायत समिति सदस्य उदयसेन काळे, किशोर चौहान, सिंधी पंचायतचे संस्थापक अध्यक्ष श्याम पंजवानी, उदासी मठाचे प्रमुख नानक वेदी, मनोज लोहारे, योगराज बुंदिले व समिती अध्यक्ष प्रशांत आहूजा, राजकुमार रोहरा यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
ही शोभायात्रा गागाभट्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, खंडोबा चौक मार्गे गोदावरी नदी तटावर नेण्यात आली. तिथे विधिवत पूजा, आरती, पल्लव व अरदास करून बैराणा साहेबांचे विसर्जन करण्यात आले.
शोभायात्रेत जयंती समिती सदस्य मुकेश पंजवानी, यश आहूजा, हरीश आहूजा, रवि रोहरा यांच्यासह सिंधी पंचायतचे पदाधिकारी राम आहूजा, दीपक आहूजा, महेश मोतियानी, घनश्याम आहूजा, जगदीश पंजवानी, महेश रोहरा, राम पंजवानी, शुभम वेदी, दीपक मोतियानी, गोपी आहूजा, अमोल मोतियानी, रामचरण धवन, साहिल आहूजा, गौरव पंजवानी, श्रीचंद पंजवानी, संत धवन, जयेश पंजवानी, कुमार सेजवानी, मयंक
आहूजा, तानिक्ष आहूजा, यश पंजवानी, विकी आहुजा, करण पंजवानी, निखिल रोहरा, वंश पंजवानी, जयेश पंजवानी, उपस्थित होते.
सिंधी महिला मंडळातर्फे सीमा रोहरा, डॉ. रिया पंजवानी, श्रष्टि रोहरा, वर्षा पंजवानी, रेशमा पंजवानी, रेणु वेदी, अनुष्का पंजवानी, जयश्री पंजवानी, पूनम आहूजा, भारती आहूजा, नेहा आहूजा, हिना आहूजा, नीतू मोतियानी, ममता आहूजा, अन्नू आहूजा, विना आहूजा, मुस्कान आहूजा, लता पंजवानी यांनी पूजाअर्चा करून शोभायात्रेत सहभाग घेतला.
यावेळी जीतू परदेशी यांच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर दहीवाळ, बजरंग लिंबोरे, शिवराज पारिख, गणेश वरकड़, राज मानधने, अमोल धस, रामेश्वर मूंदडा, जगदीश आचार्य, विलास मोरे, गोपनीय विभागाचे लक्ष्मण पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.












