बीकॉमचा विद्यार्थी पिस्तूल विक्री रॅकेटचा मुख्य सूत्रधार

Foto

दोन व्यावसायिकांकडून आणखी तीन पिस्तूल आणि नऊ काडतुसे जप्त
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
उच्चशिक्षित तरुणांच्या टोळीकडून शहरात सुरू असलेल्या अवैध पिस्तूल विक्रीच्या रॅकेटचा सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एकाच रात्रीत सहा जणांना अटक करून चार पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. बी. कॉम. चे शिक्षण घेणारा आरोपी सत्यम चाटे हा शहरातील पिस्तूल विक्री रॅकेटचा मुख्य विक्रेता असल्याचे निष्पन्न झाले. त्याने दोन व्यावसायिकांना विकलेली आणखी तीन पिस्तूल आणि नऊ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली असून, या प्रकरणी दोन्ही व्यावसायिकांनाही अटक करण्यात आली आहे.
शुभम धर्मराज वाळके (२६, रा. सावित्रीनगर, हिमायत बाग) आणि कृष्णा विष्णू अधाने (२९, रा. गोळेगाव, ता. बुलताबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी रविवारी (दि. २५) दिली. या कारवाईत
आतापर्यंत ७ पिस्तूल आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली असून आरोपींची संख्या ८ झाली आहे. सिडको ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून सुरुवातीला शिवा सुरे (२५, रा. सुरेवाडी, शिक्षण बी. एस्सी. पदवीधर), सुमीत विसपुते (२५, रा. सुरेवाडी, शिक्षण बी. एस्सी. बायोइन्फॉर्मे टिक्स), सत्यम चाटे (२३, रा. मयूरपार्क, शिक्षण बी. कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी), अर्जुन लिंगायत (२०, रा. नवजीवन कॉलनी, शिक्षण बीसीएस तृतीय वर्षाचा विद्यार्थी), श्रीकांत शिखरे (२४, रा. मयूरपार्क, शिक्षण बीसीएस) आणि विशाल भोसले (२४, रा. जाधववाडी, १२ वी पास) या टोळीला अटक करून ४ पिस्तूल ९ काडतुसे जप्त केली होती.
दरम्यान, सत्यम चाटे आणि अर्जुन लिंगायत यांच्याकडून सुरुवातीला देशी पिस्तूल जप्त केले होते. या दोघांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे व उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी सत्यम चाटे हा स्वतः
एलाय ईमेज
पुरते पिस्तूल बाळगत नसून, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर मध्यस्थामार्फत शस्त्रे आणून शहरात त्यांची कमिशनवर विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. सत्यमने सुमारे दीड महिन्यापूर्वी हिमायत बाग परिसरातील सावित्रीनगर येथे राहणारा मिनरल वॉटर बॉटल उत्पादक शुभम वाळके याच्याशी संपर्क साधला होता. सत्यमने ५० हजार रुपयाला एक याप्रमाणे दीड लाख रुपयांत शुभमला एकाच वेळी तीन देशी पिस्तूल आणून दिले होते. सत्यमकडून ३ पिस्तूल खरेदी केल्यानंतर शुभम वाळके याने स्वतः
सिंडिकेटमध्ये आणखी उच्चशिक्षित असण्याची शक्यता
▶ सत्यम चाटे याने शहरात अथवा ग्रामीण भागात आणखी किती जणांना अशा प्रकारे पिस्तूल आणि काडतुसांची विक्री केली आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याच्या बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. या सिंडिकेटमध्ये आणखी काही उच्चशिक्षित तरुण व व्यापारी अडकण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
गुन्हेगारी जगतातील सब-डीलरसारखे काम सुरू केले. त्याने या तीन पिस्तुलांपैकी २ पिस्तूल स्वतः च्या सावित्रीनगर येथील अड्यावर लपवून ठेवले. तर उर्वरित एक पिस्तूल त्याने खुलताबादच्या गोळेगाव येथे कपड्याचे दुकान चालवणारा व्यावसायिक कृष्णा अधाने याला थेट ६० हजार रुपयांमध्ये विकले. शुभमने अवघ्या काही दिवसांत १० हजार रुपयांचा निव्वळ नफा खिशात घातला.