औरंगाबाद:पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांना कर्ज, विज बिल माफी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवारी क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करीत निषेध करण्यात आला. यावेळी धिक्कार असो... धिक्कार असो, भाजप सरकार हाय- हाय आधी शासन विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, नामदेव पवार, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल मालोदे, महिला आघाडीच्या सरोज मसलगे पाटील, आदींसह पदाधिकारी- कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
गॅस पेट्रोल डिझेलमध्ये होणारी दरवाढ, यासह शेतकऱ्यांना कर्ज, विज बिल शासनाने माफ केलेले नाही. आज घडीला युवकांच्या हाताला रोजगार देखील उपलब्ध होत नाही. नुकत्याच झालेल्या धरण फुटी व भिंत कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना चा निषेधार्थ जनता के संघर्ष मे अब काँग्रेस मैदान मे या घोषवाक्य खाली आज बुधवारी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांच्या बाबत अपशब्द वापरणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच निवडणुका या बॅलेट पेपर वरच व्हायला हव्यात अशी मागणी करत हटाव देश बचावचा नारा देखील पदाधिकाऱ्यांनी लगावला. शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीज बिल माफ होत नाही. अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झालेले आहे तरी देखील मदत होत नाही. कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय होईल ना. हे सरकार झोपलेले आहे असे यावेळी बोलताना अनिल पटेल म्हणाले. यासह कर्नाटकात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपच्या वतीने करण्यात येत असल्याचा आरोप देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.