राज्यसभेसाठी भाजपाची उमेदवार यादी जाहीर, विनोद तावडे, रामदास आठवलेंसह दोन नव्या चेहऱ्यांना संधी

Foto
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
 
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रामदास आठवले,  विनोद तावडे , माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

भाजपकडून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न

भाजपकडून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा, आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला चारही उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. सोबतच, यादीतून प्रादेशिक समतोल देखील राखण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं दिसून येतंय. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील उमेदवारांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या  तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्‍चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांमध्ये शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई) , फौजिया खान (श.प. गट), रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना), धैर्यशील पाटील (पेण- भाजप), भागवत कराड (भाजप) यांचा समावेश आहे.