भाजप नगरसेवकांनी स्वतःच अतिक्रमणे पाडण्यास केली सुरुवात बेकायदा बांधकामांवरून 'राजकीय शह-काटशहा'चे राजकारण सुरू

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
एआयएमआयएम नगरसेवक मतीन शेख यांचे बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय गदारोळातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेच्या संभाव्य कारवाईपासून आणि राजकीय नाचक्कीपासून वाचण्यासाठी दोन भाजप नगरसेवकांनी रविवारी सिडको परिसरातील आपली बेकायदा आणि अतिरिक्त बांधकामे स्वतःच पाडण्यास सुरुवात केली.
बुलडोझरने मतीन शेख यांचे बांधकाम जमीनदोस्त केल्यानंतर, एआयएमआयएमने आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. माजी
खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे भाजप नगरसेवक गणेश नवंदर आणि विश्वनाथ स्वामी यांच्या बेकायदा बांधकामांचे थेट पुरावे सादर केले आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत नगरसेवक नावंदर आणि स्वामी यांना आपली बेकायदा बांधकामे
शहरात 'बुलडोझर पॉलिटिक्स'ची चर्चा
▶ लोकप्रतिनिधींनीच स्वतः ची बांधकामे पाडण्यास सुरुवात केल्यामुळे शहरातील इतर बड्या राजकीय नेत्यांचे आणि बिल्डरांचे धाबे दणाणले आहे. आगामी काळात मनपा आयुक्त अमोल येडगे उर्वरित संशयित २२ नगरसेवकांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचे लक्ष लागले आहे.
काढून टाकण्याबाबत नोटिसा बजावल्या. प्रशासनाकडून देण्यात आलेली मुदत संपण्यापूर्वीच
२२ नगरसेवकांची बांधकामे रडारवर?
▶ या कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ११५ नगरसेवकांपैकी सुमारे २२ नगरसेवकांची (माजी व विद्यमान) व्यावसायिक व निवासी बांधकामे आणि मालमत्ता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. विरोधी पक्षांनी आता या सर्व २२ नगरसेवकांच्या बेकायदा बांधकामांची यादी प्रशासनाला सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
कायद्यासमोर कोणीही मोठा नाही
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील अनधिकृत बांधकामांवर पक्षपात न करता कारवाई केली जाईल. नोटीस दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वतःहून अतिक्रमण काढले नाही, तर मनपा स्वतः ते पाडेल आणि त्याचा खर्चही संबंधित नगरसेवकांकडून वसूल केला जाईल.
आणि मनपाचा बुलडोझर दारात येण्याआधीच, दोन्ही भाजप नगरसेवकांनी रविवारी स्वतःहूनच
आपल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यास सुरुवात केली.