आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) बजाज ऑटो कंपनीच्या शेकडो ट्रेनी प्रशिक्षणार्थीनी कंपनी गेटसमोर रविवारी (दि. २०) पहाटेपासूनच पुन्हा ठिय्या मांडून निदर्शने केली. यावेळी कंपनी, टिमलीज फाउंडेशन व बंगलोरच्या जैन युनिव्हर्सिटीकडून सलग तीन वर्ष फसवणुकीचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी कामगारांच्या बसेस कडक सुरक्षेत रवाना करण्यात आल्या. मात्र तोडगा न निघाल्याने दुसऱ्या पाळीतील ट्रेनीसुध्दा यात सहभागी झाले. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.
'कमवा आणि शिका' योजनेंतर्गत हजारो ट्रेनी प्रशिक्षणार्थी कामगारांना टिमलीज फाउंडेशन व बंगलोरच्या जैन युनिव्हर्सिटीकडून डिग्री, प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन बजाज ऑटो कंपनीत जॉब देण्यात आला. मात्र कामगारांना
पोलीस सुरक्षेत सोडल्या कामगारांच्या बसेस
परस्पर कामाहून डिच्चू
66 यावेळी कंपनी, टिमलीज फाउंडेशन व बंगलोरच्या जैन युनिव्हर्सिटीकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला. अनुभव प्रमाणपत्र न देणे, अत्यल्प वेतन, पगारवाढ न करणे व तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परस्पर कामाहून कमी करणे अथवा इतर ठिकाणी शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला.
- गणेश कावळे, टीम लिडर ट्रेनी.
तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने ११ ऑगस्ट रोजी बजाज ऑटो कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांना आश्वासन देवून ठिय्या मागे घेण्याचे सांगण्यात आले होते. मात्र महिना लोटूनही आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप करत कामगारांनी रविवारी पहाटेपासूनच पुन्हा कंपनी गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलकांसह बजाज ऑटो कंपनी व्यवस्थापन, टिमलीज फाऊंडेशनचे सदस्य व मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















