बँकेचे सील तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश; पोलिसात गुन्हा दाखल

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जवाहरनगर पोलीस ठाण्यात बँकेने सील केलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश प्रकाश घोडके असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार १ ऑगस्ट रोजी दुपारी गितांजली अपार्टमेंटमधील डुप्लेक्स फ्लॅट क्रमांक १-अ येथे उघडकीस आला. याप्रकरणी उमेश देवराम ढवळे (वय ५२), एन.के.जी. एस.बी. सहकारी बँकेचे प्रतिनिधी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फ्लॅट खरेदी व व्यावसायिक कारणांसाठी घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीमुळे संबंधित मालमत्ता बँकेने न्यायालयीन प्रक्रियेनंतर ताब्यात घेऊन सील केली होती. मात्र १ ऑगस्ट रोजी पाहणीदरम्यान फ्लॅटचे सील केलेले दार उघडे आढळले आणि आत आरोपीच्या व्यवसायाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. बँकेची परवानगी न घेता सील केलेल्या मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी आरोपीवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार वानखेडे करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions