आर्य चाणक्यमध्ये बँकिंग कार्यशाळा उत्साहात

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : आर्य चाणक्य प्रा विद्या मंदिर येथे इ. ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता अंतर्गत बँक व बँकेचे व्यवहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानेश्वर खराद हे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली. ज्ञानेश्वर खराद यांनी विद्यार्थ्यांना बँक म्हणजे काय? बँकेत खाते कसे उघडावे? बचतखाते व चालू खाते म्हणजे ? आरटीजीएस म्हणजे काय? ठेवीचे विविध प्रकार, कर्जाचे प्रकार व त्यावर आकारले जाणारे व्याज, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड पासबुक, चेक, केवायसी याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

यात विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाविषयी सविस्तर माहिती देवून त्यांच्या शंकाचे निरसन केले. या उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यामध्ये आर्थिक साक्षरता हे मूल्य जोपासण्यात आले. विद्यार्थ्याच्या मनातील बँकेविषयी असलेली भिती दूर करण्यात आली. सदरील कार्यक्रम गणित मंडळा अंतर्गत राखी धोकटे तसेच शुभांगी सदावर्ते यांनी घेतला व मनोज शिंगारे, विनोद सरोदे, धिरज हंडरगुळे, बाळासाहेब लाड, सतिश आहेर व शिखा शहा, प्रियंका निकाळजे, ग्रीष्मा चौके यांनी यासाठी सहकार्य केले.