गणपती बापा मोरयाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गणरायाच्या आगमनाने गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय झालेल्या शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्य गणेश विसर्जन सोहळा पार पडला. मात्र, छावणी परिसरात गणेश विसर्जन एक दिवस उशिराने करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी छावणी परिसरात पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
छावणीची एक दिवस उशिरा गणेश विसर्जन करण्याची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवत यावर्षीही विसर्जन मिरवणूक जल्लोषात, आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार
परंपरा कायम
पडली. छावणी गणेश महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डीजेमुक्त आणि गुलालमुक्त वातावरणात आणि पूर्णतः शांततेत ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा शुभारंभ व आरती मिरवणुकीची सुरुवात पोलीस
▶ छावणी परिसरातील मोठ्या संख्येने गणेश मंडळाच्या वतीने विसर्जन करण्यात आले, विविध मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढल्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पाच्या जयघोषात गणेशभक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरात यंदा अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. मुख्य विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर छावणी परिसरातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले होते. छावणी परिसरातील विसर्जनाची वेळ आणि दिवस शहरातील मुख्य विसर्जन सोहळ्यापेक्षा वेगळा असल्याने परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळनंतर विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गावर दाखल होऊ लागल्या, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले कार्यकर्ते, ढोल-ताशा पथके आणि बाप्पाच्या जयघोषामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. मंडळांच्या कार्यकत्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका काढत गणरायाला निरोप दिला. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी गजबजलेला छावणी परिसर आज बाप्पाच्या विसर्जनाने भावुक झाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते श्रींची आरती करून करण्यात आली. आरतीनंतर मानाच्या आणि विविध प्रभागांतील गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये व फुलांची उधळण करण्यात
आली. मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता गणेशभक्तांवर चोहोबाजूंनी पुष्पवृष्टी करण्यात आली. पारंपरिक ब्रास बैंड, लेझीम पथक, झांज पथक, पावली पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला,
महाप्रसादाचे वाटप
मिखणूक मार्गावर राजकमल गणेश मंडळ, पंचमुखी गणेश मंडळ व इतर मंडळांच्या वतीने अन्नदान व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या हस्ते भक्तांना अन्नदानाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. प्रशासनाचे चोख नियोजन व पोलीस बंदोबस्त केला. ११४ पोलीस कर्मचारी, २६ महिला पोलीस कर्मचारी, दोन वाहतूक पोलीस निरीक्षक व त्यांची टीम, तसेच २६ कॅमेरामन संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. यामुळे वाहतुकीचा कोणताही खोळंबा झाला नाही. महावितरणचे सहायक कार्यकारी अभियंता चंदन मोरे व त्यांच्या टीमने संपूर्ण मिरवणुकीदरम्यान अखंडित वीजपुरवठा चालू ठेवला. शेवटच्या गणपतीचे रात्री ११ वाजता विसर्जन शांततेत व भावुक वातावरणात करण्यात आले.
यावेळी या सोहळ्यास छावणी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक सायना यादव, अध्यक्ष महादेव जाधव, कार्याध्यक्ष रकमाजी जाधव, करणसिंग काकस, किशोर कछवा, प्रशांत भैय्या तारगे, शेखहनिफ, संजय गारोल, पप्पू वर्मा, बोंबी हिंगरा, नितीन यादव, निलेश गजरा, राम गजरा, कमलेश सलामपुरे, दर्शन यादव, रितू यादव, देव ऐल्दी, कुमार गांजले, दीपक क्षीरसागर, कल्याण सुरसे, विशाल दाभाडे, बाळा भैय्या, नितेश गायकवाड, नंदू अण्णा ऐल्दी, शेखर भंडारी, ओंकार वाघमारे, देवा मदनानी, बाळा आमले, यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छावणी गणेश महासंघाचे अध्यक्ष महादेव जाधव व रखमाजी जाधव यांच्या वतीने बंदोबस्ता वर तैनात असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रीचे जेवणाची व्यवस्था करून दिली.
पोलीस आयुक्तांकडून गौरव उद्गार
या प्रसंगी छावणी गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक सायना यादव यांनी महासंघाच्या उपक्रमाची माहिती दिली. त्यावर बोलताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छावणी गणेश महासंघ हा नियमांचे काटेकोर पालन करणारा महासंघ असून, त्यांनी जपलेली डीजे आणि गुलालमुक्त मिरवणुकीची परंपरा अत्यंत कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत गौरव केला.













