छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना बुढीलाईन परिसरात घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख साहील, शादाब, शेख साहीलचा जिजा, शेख मोबिन रा. सईदा कॉलनी अशी आरोपींची नावे आहेत. शेख हैदर शेख चांद रा. आरेफ कॉलनी यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार २२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी फ्रुट खरेदी करून घरी जात असताना काहीही कारण नसताना आरोपी शेख साहिल याने धारदार वस्तुने फिर्यादींच्या डोक्यात वार केला. शादाब याने गालावर व मानेवर मारून जखमी केले. फिर्यादीचा मित्र शेख अरबाज हा भांडण सोडवत असताना त्याला ढकलून दिले. आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडविले असता आरोपींनी तू दुबारा दिख तुझे जान से मार दुंगा अशी धमकी आरोपींनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सईद खान करीत आहेत.














