छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील सिल्लेखाना परिसरातील एका अवैध कत्तलखान्यावर क्रांती चौक पोलिसांनी सोमवारी सकाळी मोठा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी क्रूरपणे बांधून ठेवलेल्या ४ जनावरांची सुटका केली असून, सुमारे २५० किलो प्रतिबंधित गोमांस जप्त केले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून शफीक नावाच्या एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे, तर त्याचे कलीम कुरेशी, अझहर शेख यांच्यासह ७ साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी एकूण ८
जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार शरद देशमुख यांना सोमवारी सकाळी ८ वाजता एका खबऱ्याकडून या अवैध कत्तलखान्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पथक तयार करून ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. हे आरोपी शहरातील विविध हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांना बेकायदेशीरपणे गोमांस पुरवत होते. या कारवाईमुळे शहरातील एका मोठ्या अवैध गोमांस विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











