'बेल बॉटम' चे होणार विदेशात चित्रीकरण

Foto
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात सगळ्याच क्षेत्रातलं कामकाज ठप्प झालं होतं. परिणामी, कलाविश्वातील कामही बंद होतं. मात्र आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असून हळूहळू सगळ्याच क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरु होताना दिसत आहे. यात अनेक मालिका, चित्रपट यांच्याही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आता लवकरच अक्षय कुमारच्या आगामी ‘बेल बॉटम’ चित्रपटाचंही चित्रीकरण सुरु होणार आहे. तसंच या चित्रपटाचं विदेशात चित्रीकरण होणार असल्यामुळे लॉकडाउननंतर विदेशात चित्रीत होणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे.
कोरोनामुळे अचानक ओढावलेल्या संकटामुळे अक्षयच्या सात चित्रपटांचं चित्रीकरण आणि प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. मात्र आता लवकरच त्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात त्याच्या आगामी ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचं ऑगस्ट महिन्यात चित्रीकरण सुरु होणार आहे.रंजित तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचं लंडनमध्ये चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, येत्या काळात अक्षयचे ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसंच लवकरच तो ‘बाप रे बाप’ या चित्रपटातही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker