खबरदार ! 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा 74 वरुन 89 वर तर तिसरा बळी

Foto
महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे. त्या साठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेजे आहे असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. 

दरम्यान रविवारी राज्यात 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील 4, मुंबईचे 5 तर नवी मुंबई येथील 1 रुग्ण आहेत. राज्यातील बाधितांची संख्या आता 74 झाली होती. आता ती संख्या वाढून 89वर गेली आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला.

कोरोना मुळे तिसरा बळी. 

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आता आणखी एकाचा जीव गेला आहे. मुंबईत कोरोनानं फिलिपिन्सवरून आलेल्या 68 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णाला मधुमेह आणि दम्याचा त्रास होता. 13 मार्चला त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचं निदान झाल्यानंतर मूत्रपिंड आणि श्वसनाचा त्या रुग्णाचा त्रास अधिक तीव्र झाला होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला आहे. फिलिपिन्समधून आलेल्या प्रवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेला हा आठवा रुग्ण आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker