भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झाली. जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मिरवणूक मार्गानंतर प्रवेशद्वार जवळ मिरवणूक येताच उत्सव समितीच्या वतीने साकारण्यात आलेली विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशे आणि भीमगीतांच्या तालावर उपस्थित सर्वच जण
उत्साहात न्हावून निघाले. मिरवणूक मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच तालुका शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्वागतकक्ष उभारून येथे शरबत तसेच व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना शरबत चे वाटप केले. 

यावेळी मिरवणुकीतील नागरिकांनी शरबतचा मनसोक्त भवानंदकिशोर सहारे, दामूअण्णा आस्वाद घेतला. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने देखील ठिकठिकाणी स्वागतक्ष तसेच पाणपोईचे नियोजन करण्यात आले होते.

या मिरवणुकीत आ. अब्दुल सत्तार, नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवीदास पा. लोखंडे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर, कृउबा समितीचे संचालक गव्हाणे, सतीश ताठे, रमेश लाठी, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे, नगरसेवक अकिल वसईकर, सिद्धेश्वर आहेर, जमा खा पठाण, जितू आरके, इम्रान शेख (गुड्डू), सुनील दुधे, मनोज झंवर, अशोक बन्सोड, शेख सलीम हुसेन, सत्तार हुसेन, डॉ. फेरोज खान, राजू गौर, हाजी मोहम्मद हनिफ, मुशातक देशमुख, नारायण फाळके, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, रवी गायकवाड, फहिम पठाण, विशाल जाधव, मधुकर गवळी, सुनील पांडुरंग दुधे यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.