छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी होणार आहे. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. एका बाजूला अनुयायांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शारदा मंदिर कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्याध्यापिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सविता समुळे, उपमुख्याध्यापक अनुराधा पांडे तसेच पर्यवेक्षिका सविता पवार यांच्या हस्ते करण्यात आली. माध्यमिक विभागाच्या संजीवनी लहासे यांनी देशाच्या विकासात बाबासाहेबांचे शैक्षणिक योगदान यावर मार्गदर्शन केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या उषा माने
र न न गी श्री हा
प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जयंतीनिमित्त शहरातील आणि विविध बुद्धविहारे वसाहतींमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. शहरात एकूण ९६ पुतळ्यांजवळ अभिवादन, १५० ठिकाणी प्रतिमा पूजन आणि १०२ अभिवादन केंद्रे उभारण्यात आली आहेत. स्वागत कमानी व रोषणाईने रस्ते उजळून निघाले असून, क्रांती चौक ते औरंगपुरा,
सिटी चौक या मुख्य मार्गावर सुमारे ३० स्टेज उभारण्यात आले आहेत. दुपारपासून वाजता क्रांती चौक येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक सिल्लेखाना, पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौकमार्गे भडकलगेट येथे पोहोचून विसर्जित होईल. तसेच छावणी आणि सिडको हडको भागातून येणाऱ्या मोठ्या मिरवणुका सिटी चौक आणि बाराभाई ताजिया येथे मुख्य मिरवणुकीत सामील होतील.
शारदा मंदिर कन्या प्रशालेत डॉ. आंबेडकरांना अभिवादन
यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांच्या आई व पत्नीच्या त्यागमय व्रतस्थ भूमिकेचा भावनिक उलगडा केला. यावेळी मंगला गायधने यांनी भीमगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. अध्यक्षीय समारोपात डॉ. सबिता मुळे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे चिंतन करून शाळेच्या प्रगतीसाठी समर्पण भावनेने कार्य
करण्याचा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मंगला गायधने यांनी प्रभावीपणे केले. नीता दहिवाळ यांनी साकारलेल्या सुंदर व समर्पक फलक लेखनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संसदेच्या शकुंतला प्रधान, ज्योतीकिरण आवले, मंगला गायधने आदींनी परिश्रम घेतले.
१४०० पोलिसांचा फौजफाटा
▶ यावर्षी शहरात ४ मुख्य आणि २४० उपमिरवणुका निघणार आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी १५ पाणपोई आणि ५ मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. १४०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा मिरवणूक मार्गावर आणि संवेदनशील भागात गुन्हे शाखा व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यासह विद्यापीठाचे कर्मचारी-अधिकाऱ्यांनी निळे फेटे बांधून लक्ष वेधले.
ढोल-ताशांच्या गजरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तैलचित्राची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सुमारे सहा तास चाललेल्या या मिखणुकीत कुलगुरू यांच्यासह सर्व अधिकारी, शिक्षक व विद्याथ्यर्थ्यांनी निळे फेटे बांधून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब अआंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा, व्याख्यान, प्रतिमेची मिरवणूक या कार्यक्रमांचे आयोजन ७ ते १४ एप्रिल दरम्यान करण्यात आले. विद्यापीठ गेटसमोरील पुतळ्यापासून तैलचित्राची मिरवणूक मंगळवारी (दि.१४) सकाळी साडे आठ वाजता काढण्यात आली. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी तैलचित्रास
पुष्प अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली. सुमारे सहा तास चाललेल्या मिरवणुकीत निळे फेटे घालून सहभागी झालेल्यांनी लक्ष वेधून घेतले. मुला-मुलींनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सुमारे तीन तास चाललेली मिरवणूक विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर समारोप करण्यात आला.