VIDEO:पोलिसांच्या गाडीचे ‘सायरन’ ऐकताच भुजबळांची उडाली धांदल

Foto

चाळीसगाव- महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ  अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यानंतर छगन भुजबळ यांची  जामिनावर सुटका झाली असली तरी आजही पोलिसांच्या गाडीचा सायरन छगन भुजबळ यांची धांदल उडवतो. आज ( शुक्रवारी )  चाळीसगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन सभेत भुजबळांच्या भाषणादरम्यान पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला आणि अस्वस्थ होत भुजबळ म्हणाले की ‘हे जिथे जायचे आहे तिथे जात नाहीत आणि भलत्यांच्याच मागे लागतात.’

 

आपल्या भाषणात भुजबळ पुढे म्हणाले की, “एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कंत्राट होते. मग मला साडेआठशे कोटी कसे मिळतील? असा सवाल करतानाच या गोष्टीने छगन भुजबळ थांबणार नाही, घाबरणार नाही. अरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर माझा पंगा झाला. तुम्ही कोण आहात?” अशा शब्दात त्यांनी सरकारला ठणकावले. ही लढाई संविधान विरुद्ध मोदी आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील एवढे जनतेने लक्षात घ्या. ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे. संविधानाने सव्वाशे कोटी लोकांना एका धाग्यात बांधून ठेवले आहे. ते संविधान आपल्याला वाचवायचे आहे”, असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker