बिहार निवडणूक ः चंद्रकांत खैरे स्टार प्रचारक

Foto
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग असून, शिवसेनेनेही बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या 50 जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती यापूर्वी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे यांच्यासह 20 जणांच्या नावांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे. असे असले तरी त्यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील मतदान 3 तर तिसर्‍या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसंच निवडणुकीचे निकाल 10 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. याव्यतिरिक्त करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मतदारांना एका तासाचा अधिक कालावधी देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या निवडणुकीत तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker