वैजापूर, (प्रतिनिधी): भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने युवक ठार अपघात झाला. हा बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नागपूर मुंबई महामार्गावर भग्गाव घडला.
चौफुलीवर ऋषिकेश बाळासाहेब शेटे (१८) रा. भग्गाव असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे. ऋषीकेश सकाळी घरून शेतात विद्युत पंप बंद करण्यासाठीदुचाकी (एमएच २० एच ए५१४८) वर जात होता. त्यावेळी भग्गाव चौफुलीजवळ रस्ता ओलांडत असताना कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने (एम ०५ डी के ९७६०) दुचाकीला जोराची धडक दिली. यात ऋषिकेश याचा जागेवर मृत्यू झाला.
पोलीस पाटील अनिल थिवर यांनी नागरीकांच्या मदतीने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ऋषीकेश हा रोटेगाव येथील एम आय टी महाविद्यालयात इंजीनियरिंग चे शिक्षण घेत होता. तो आई वडिलांना एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.














