छत्रपती संभाजीनगर, (सांज ब्यूरो) शहरातील बायपास परिसरात पनकिता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमातास ही घटना घडली. अलका कैलास कासलीवाल (वय ७०, रा. देवळाई परिसर) या मंदिरातून दर्शन घेऊन बायी घरी परतत होत्या त्या देवळाई चौकातून पुढे जात असताना दुपवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्यातील सुमारे दोन गोळ्याचे मंगळसूत्र झडप घालून हिसकावले आणि क्षणार्धात पसार झाले, अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिलेला धक्त बाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करायात आले असून पुढील तपास सुरू आहे.












