छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) जाधववाडी येथील सिद्धेश्वरनगर सोसायटीमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विळख्यात अडकलेल्या एका कोकिळेला पक्षीमित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. रविवारी (दि. १४) ही घटना घडली.
सिद्धेश्वरनगर सोसायटीमधील एका आंब्याच्या झाडावर कोकिळा बागडत असताना, अचानक तिचा पाय झाडावर अडकलेल्या मांजात गुंतला. यामुळे तिला उडता येत नव्हते आणि ती बचावासाठी पंखांची फडफड करत होती. हा आवाज स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने महाराष्ट्र जल-वन, उद्यान व पशू-पक्षी बचाव अभियानाचे अध्यक्ष तथा पक्षीमित्र संजय दळवी यांच्याशी संपर्क साधला. दळवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडावर चढून कोकिळेच्या पायातील मांजा काळजीपूर्वक बाहेर काढला.
र्व डी वी
मांजामुळे कोकिळेच्या पायाला जखम झाली होती. तिला घरी आणून प्राथमिक उपचार म्हणून पायाला हळद लावण्यात आली, तसेच तिची दाणा-पाण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर दळवी यांनी वनविभागाचे कर्मचारी आहेर यांच्याशी संपर्क साधून या कोकिळेला . वनविभागाच्या स्वाधीन केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions















