सिल्लोड, (प्रतिनिधी): येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे धोर समाजसुधारक, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अब्दुल समीर यानी उपस्थितांशी संवाद साधत, संत गाडगे महाराज जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्ञानविकास विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन
मुख्यध्यापक रायभान जाधव यांनी ज्ञानविकास विद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त केले. यावेळी शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचा जन्मदिन होता त्या विद्यार्थ्याकडून पूजन केले जाते, अभिवादन केले जाते. यावेळी शिक्षक वृंद, शालेय वाहन चालक मालक, पालक हजर होते.
पंचायत समिती कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात
सिल्लोड, (प्रतिनिधी) पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना रत्नाकर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिपक गावंदे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून। त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात कार्यालयात साजरा करण्यात आली यावेळी कार्यालयातील सर्व
विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..














