भाजप,एमआयएम पदाधिकाऱ्यांचे आगमन होताच…गायिकेने गायले गलीमे आज चांद निकला

Foto

औरंगाबाद- भाजप आणि शिवसेना युतीचे सध्याचे वैर जगजाहीर आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कभी खुशी, कभी गम प्रमाणे त्यांचा कारभार सुरु आहे. रविवारी (दि.२४) शहर बससेवेच्या लोकार्पण कार्यक्रमात उपस्थित राहण्याबाबत  अगोदर नकार देणाऱ्या भाजप आणि एमआयएम पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळेस हजेरी लावल्याने शिवसेनेकरिता हा कार्यक्रम गली मे आज चांद निकला असाच ठरला. विशेष म्हणजे याप्रसंगी आयोजित गीतसंगीताच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांचे आगमन होताच गायिकेने ‘गली मे आज चांद निकला हे गीत गायल्याने दुर्गम योगायोग जूळून आला.


गेल्या अनेक वर्षांपासून युती असलेल्या सेना-भाजपात हल्ली गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत वादाचे प्रकार घडत आहे. काल रविवारी पार पडलेल्या सिटी बस लोकार्पण कार्यक्रम तयारी पासूनच याचा परिचय पुन्हा एकदा आला.मुख्यमंत्र्यपूर्वी आदित्य ठाकरेंची कार्यक्रमकरिता वेळ घेणे,त्यावरून महापौर नंदकुमार घोडेले व उपमहापौर विजय औताडे यांच्यातील शाब्दिक फटकेबाजी, मुख्यमंत्रांनी जानेवारीची वेळ देणे त्यामुळे हा कार्यक्रम शेवटी शिवसेनेचाच ठरणार होता. परंतु याबाबत शेवटच्या क्षणाला उच्च स्थरावरून तडजोड झाल्याने लोकार्पणाला भाजप व एमआयएम यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. अनेक वादानंतर सर्व एकत्र आल्याने हा कार्यक्रम शिवसेनेकरीता गलीमे आज चांद निकला असाच ठरला. 

 

प्रसंगी आयोजित गीतांच्या कार्यक्रमात सुद्धा भाजपा पदाधिकाऱ्यांचे आगमन होताच तुम आये तो आया मुझे याद, गली मे आज चांद निकला. जाने कितने दिनोके बाद...गली मे आज चांद निकला...सुनी रब ने मेरी फरियाद, गली मे आज चांद निकला. हेच गाणे गायिकेने गायल्याने दुर्गम असा योगायोग जुळल्याचे निदर्शनास आले.