छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात रक्तटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली असून, दररोज सुमारे १०० ते १५० युनिट रक्ताची कमतरता भासत असल्याचे समोर आले आहे. या तुटवड्यामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, यॅलेसेमियाग्रस्त बालके तसेच गंभीर आजारांतील रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची
शक्यता निर्माण झाली असल्याचे विकृतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.
शहर आणि घाटीतील विभागीय रक्तकेंद्रात उपलब्ध साठा झपाट्याने कमी होत असून, तातडीच्या गरजांसाठी रक्त मिळवणे कठीण होत असल्याचे डॉक्टरांनी
सांगितले.
विशेषतः उन्हाळ्यात आणि सुट्यांच्या काळात रक्तदात्यांची संख्या घटते, त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना पुढे येत स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. आपले थोडेसे रक्त
कोणाच्यातरी आयुष्याचा आधा बनू शकते, असा संदेश देत मोठ्या प्रमाणात जनसहभागाची गरज व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी जास्त जास्त रक्तदान करावे तसेच विभागीय रक्त केंद्र, घाटी रुग्णालयातील ९४०५६००१८८/९५०३१२४१०९/०२४० २४०२१०८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन डॉ. भारत सोनवणे यांनी केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











