सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सिल्लोड शहर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण केल्या. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे लाडक्या बहिणींनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. महिलांच्या या सहभागाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन भाजप सिल्लोड शहर मंडळाचे अध्यक्ष मनोज मोरेल्लू यांच्या पुढाकाराने केले. भाजप नेते सुरेश बनकर, भाजपा शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, नगरसेवक स्वप्नील शिनगारे, गणेश भूमकर, डॉ तायडे, अतुल साळवे, आजू शहा, योगेश साळवे, अमोल दगडघाटे, निखिल गवळी, अक्षय खंडागळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे सांगत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळते.

तसेच समाजात सेवा, समर्पण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट होते, असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळे भाजपा सिल्लोड शहर मंडळाच्या कार्याची नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली आहे.